Join us

गोरेगाव इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांचा तपास करण्यासाठी समिती स्थापन

By जयंत होवाळ | Updated: October 8, 2023 16:51 IST

Mumbai News: गोरेगाव येथील एसआरए इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या  अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली आहे.

- जयंत होवाळमुंबई - गोरेगाव येथील एसआरए इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या  अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली आहे.समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.आग नेमकी कशामुळे लागली,आग लागण्यास जबाबदार कोण , इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा होती का,असल्यास ती सक्षम होती का याचा तपास समिती करेल.त्याशिवाय भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाय सुचवण्याची शिफारसही समितीला करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईआग