माहीमच्या समुद्रात लहान मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2023 22:16 IST2023-04-23T22:16:42+5:302023-04-23T22:16:51+5:30
एकाला वाचवण्यात यश

माहीमच्या समुद्रात लहान मुलाचा बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहीम येथील समुद्रात १२ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रिहान मंडल असे त्या मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान एकाला वाचवण्यात यश आले आहे.
माहीम येथील समुद्रात पोहोण्यासाठी तिघे अल्पवयीन गेले. त्यातील दोघे जण समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांनी आरडाओरडा केला. त्यातील एकाला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले तर रिहानचा बुडून मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.