Join us

गोरेगावमध्ये ५ वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार

By मनीषा म्हात्रे | Updated: March 17, 2024 18:19 IST

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आई कामासाठी बाहेर जाताच आरोपी मुलीसोबत डॉक्टर डॉक्टर खेळण्यासाठी येत असे.

 

मुंबई : गोरेगावमध्ये डॉकटर बनण्याच्या खेळाआड शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय आरोपीकडून ५ वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आई कामासाठी बाहेर जाताच आरोपी मुलीसोबत डॉक्टर डॉक्टर खेळण्यासाठी येत असे. याच खेळाआड मुलीचे लैगिक शोषण करत तिच्यावर लैगिक अत्याचार करत होता. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास मुलीला जंगलात सोडून देण्याची भीती दाखवत होता.

अखेर, मुलीच्या वागण्यातील बदल पाहून आईने तिला विश्वासात घेत चौकशी केली. तेव्हा, मुलीने अत्याचाराला वाचा फोडली. आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

टॅग्स :गुन्हेगारी