Join us
Daily Top 2Weekly Top 5

परेवर १४ तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या केव्हा सुरू होणार? हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 13:08 IST

अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार...

मुंबई :  पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवार, रविवारी १४ तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या अप- डाउन दोन्ही मार्गावर आणि अप -डाउन हार्बर मार्गावर आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत. 

कधी सुरू होणार? -- शनिवारच्या मध्यरात्री १२ वाजता मेगा ब्लॉक सुरू होईल.- रविवार दुपारी दोनपर्यंत मेगा ब्लॉक सुरू राहील.मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे? माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर 

केव्हा? - सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५  पर्यंतपरिणाम - या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाउन धीम्या  मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील.

हार्बर रेल्वे कुठे? : पनवेल-वाशी  अप आणि डाउन मार्गावरकेव्हा :  ११:०५ ते ४:०५ वाजेपर्यंतपरिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरिता जाणारी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

परिणाम काय? -या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सर्व अप आणि डाउन लोकल धीम्या मार्गावर चालवल्या जातील. 

- राममंदिर स्थानकावर गाड्या थांबणार नाहीत.- मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत.- चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान काही धीम्या लोकल सेवा खंडित केल्या जातील.  

टॅग्स :लोकलमुंबईमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे