दहा विषय समितीसाठी ९९ सदस्य

By Admin | Updated: May 8, 2015 00:14 IST2015-05-08T00:14:45+5:302015-05-08T00:14:45+5:30

जिल्हा परिषदेसाठी पहिल्यांदाच दहा विषय समितीसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये ९९ सदस्यांची निवड करण्यात आली. या

99 subjects for the ten subject committee | दहा विषय समितीसाठी ९९ सदस्य

दहा विषय समितीसाठी ९९ सदस्य

पालघर : जिल्हा परिषदेसाठी पहिल्यांदाच दहा विषय समितीसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये ९९ सदस्यांची निवड करण्यात आली. या समितीमध्ये चार सदस्य म्हणून पदसिद्ध अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याने या समितीमध्ये एकूण १०३ सदस्य राहणार आहेत.
जिल्हा परिषदमधील महत्वाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले या पदसिद्ध असून इतर सभापती म्हणून अर्थ समितीचे सभापती सचिन पाटील, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अशोक वडे, बांधकाम सभापती सुरेश तरे, समाजकल्याण सभापती धर्मा गोवारी व महिला बालकल्याण सभापती विनीत कोरे, तर सदस्य प्रकाश निकम, दिलीप गाटे, अशोक भोये, निलेश गंधे, रडका कलंगडा, योगेश पाटील, धनश्री चौधरी, भावना विचारे या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय प्रक्रियेच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी धर्मा यांची निवड झाली. सदस्या म्हणून धनश्री चौधरी, राजाराम तांडेल, किशोर बरड, निता पाटील, शुभांगी कुटे, दीपा ठेपका, भालचंद्र खोडका, दिलीप गाटे, नेहा शेलार यांचा समावेश आहे.
बांधकाम समितीच्या सभापतीपदी सुरेश तरे तर सदस्य म्हणून जयवंती घोरखाना, सुनिता चोथे, विजय खरपडे, घनशा मोरे, तुळशीदास तामोरे, काशिनाथ चौधरी, जयवंत गुरोडा, देवराम पाटील यांचा समावेश आहे.
जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी अध्यक्षा सुरेखा थेतले, अशोक वडे, सुरेश तरे, विनीता कोरे, धर्मा तिवारी, अशोक भोये, सिंधू भोये, कमलाकर दळवी, कल्याणी तरे, तर पदसिद्ध सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, कार्यकारी अभियंता पाटबंधारे व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
अर्थखात्याच्या महत्वपूर्ण समितीवर सभापती म्हणून उपाध्यक्ष सचिन पाटील तर सदस्य दर्शना दुमाडे, गीता धोमोडे, चित्रा किणी, चेन धोडी, पार्वती भुसारा, रंजना संखे, कल्याणी तरे, किशोर बरड यांची निवड करण्यात आली आहे.
पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी अशोक वडे तर सदस्य म्हणून सिंधू भोये, दर्शना दुमडा, शुभांगी कुंटे, रवींद्र पागधरे, जीवन सांबरे, कौशिका डांबरे यांचा समावेश आहे.
कृषी समिती सभापती अशोक वडे, सदस्य जीजा टोपले, अरुण गोंड, विजय खरपडे, मिनाली राऊत, कमलाकर दळवी, विपुल सावे, जीवन सांबरे, सुरेश कोरडा, प्रमिला काकड, दामोदर पाटील यांचा शिक्षण समितीमध्ये सचिन पाटील, गीता धामोडे, सुरेश कोरडा, हेमलता राठोड, किर्ती हजारे, वैष्णवी रहाणे, चेतना मेहर, रतन बुधर, भारती कामडी, महिला बालकल्याणमध्ये विनीता कोरे, कल्पना कामडी, सुवर्णा पडवळे, ज्योती भोये, चंद्रीका आसात, वैष्णवी रहाणे, गुलाब राऊत आदी तर आरोग्यमध्ये सुरेश तरे, रंजना संखे, लक्ष्मी ठाकरे, निता पाटील, चित्राकिणी, सारिका निकम, दामोदर पाटील, सुनिता शिंगडा आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: 99 subjects for the ten subject committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.