Join us

मुलुंडमध्ये दुमदुमली नाट्यदिंडी, सेलिब्रेटीही झाले सामील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:23 IST

४०० लोककलावंत, ढोलताशा वाजवणारे सेलिब्रेटी, आणि सहा फुटी कोंबड्याने नाट्यसंमेलनापूर्वीच्या दिंडीची रंगत वाढली. सेलिब्रेटींना पाहायला मुलुंडवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी केली होती.

मुंबई - ४०० लोककलावंत, ढोलताशा वाजवणारे सेलिब्रेटी, आणि सहा फुटी कोंबड्याने नाट्यसंमेलनापूर्वीच्या दिंडीची रंगत वाढली. सेलिब्रेटींना पाहायला मुलुंडवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी केली होती.रेल्वे स्थानकाजवळील हनुमानाचे दर्शन घेऊन दिंडी मार्गस्थ झाली. त्यातील नाट्यकलावंत आणि लोेककलावंताच्या उपस्थितीने पुढचा तासभर ही दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे हे पालखीचे भोई झाले होते. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार याही नाट्यदिंडीत सहभागी झाल्या होत्या. अभिनेते शरद पोंक्षे, भरत जाधव, प्रदीप वेलणकर, मंगेश देसाई, मधुरा वेलणकर, सागर कारंडे, भारत गणेशपुरे अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सुयश टिळक, सौरभ गोखले या सेलिब्रेटींनी दिंडीत सहभागी होऊन लोककलाकारांना प्रोत्साहन दिले. स्थानिक रंगकमीर्ही त्यात होते. साधारण दीड तासानंतर दिंडी नाट्यनगरीत दाखल झाली. सेलिब्रेटींसोबत सेल्फी काढण्यासाठी नाट्यदिंडीत नागरिकांची झुंबड उडाली होती. सेलिब्रेटी सामील असलेल्या मोरया ढोलताशा पथकाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सुयश टिळक, सौरभ गोखले, अमोल बावडेकर यांनी या पथकात वादनाचा मनमुराद आनंद लुटला. अभिनेत्री स्मिता तांबेने घातलेली फुगडी गाजली.सेलिब्रेटींसोबतच आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य, आदिवासी बोहाडा, तारपा, धनगरी गोफ, धनगरी गजो, कातरखेळ, भाल्या, दशावतार, लेझीम, दांडपट्टा अश्या १६ लोककलांचा सहभाग यात होता. रंगीबेरंगी पोशाखातील या लोककलावंताना पाहण्यासाठी जशी दिंडीमार्गावर गर्दी होती, तशीच त्यांचे फोटो टिपण्यासाठीही झुंबड उडत होती. ते लगेच सोशल मीडियावर अपलोड केले जात होते. नाट्यसंमेलनाच्या इतिहासात इतक्या लोककलावंतासह पार पडलेली ही एकमेव नाट्यदिंडी ठरली. दरम्यान, लोककलेतून महाराष्ट्रातील प्रत्येकाला ताल धरायला लावणाऱ्या अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ या संगीतमय कार्यक्रमाने ९८व्या नाट्यसंमेलनाचा श्रीगणेशा झाला.सहा फुटी कोंबडा गेला भाव खाऊननाट्यदिंडीत तारे-तारकांची उपस्थिती असूनही सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सहा फुटी कोंबड्याने. नाट्यदिंडीत सर्वात शेवटी असलेल्या या कोंबड्याच्या उड्यांना सर्वांचीच दाद मिळली. दिंडीची सांगता होईपर्यंत या कोंबड्याचाच बोलबाला होता. हनुमान मंदिरापासून ते नाट्यनगरीपर्यंतच्या नाट्यदिंडीच्या वाटेत अनेक नागरिकांनीच नव्हे, तर सेलिब्रेटींनीही या कोंबड्यासोबत सेल्फी घेतली.आज नाट्यसंमेलनातगुरुवार, १४ जूनसकाळी १० वाजताबालनाट्य - तेलेजूसादरकर्ते- रंगसंवाद प्रतिष्ठान, सोलापूरस्थळ- महाकवी कालिदास रंगमंचसकाळी ११ वाजताग्रिप्स थिएटर जंबा बंबा बूसादरकर्ते- महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणेस्थळ- महाकवी कालिदास रंगमंचदुपारी २ वाजताएकांकिका- इतिहास गवाह हैसादरकर्ते- बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणेस्थळ- महाकवी कालिदास रंगमंचदुपारी ३ वाजतानृत्य-नाटिका, तुका म्हणेसादरकर्ते- कलावर्धिनी, पुणेस्थळ- महाकवी कालिदास रंगमंचदुपारी ४ वाजतापरिसंवाद- सांस्कृतिक आबादुबीस्थळ- डॉ. हेमू अधिकारी रंगमंचसायंकाळी ६ वाजतागो.ब. देवल पुरस्कार वितरण सोहळानाट्यसंमेलनध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची मुलाखत, नाट्यप्रवेश व नाट्यगीतस्थळ- महाकवी कालिदास रंगमंचरात्रौ ९ वाजतासंगीतबारी, सादरकर्ते- काळी बिल्ली प्रॉडक्शन,स्थळ- महाकवी कालिदास रंगमंचमध्यरात्री १२.३० वाजतालोककला जागरझाडीपट्टी दंडार, पोतराज, दशावतार, नमन यांचे सादरीकरणस्थळ- महाकवी कालिदास रंगमंचपहाटे ६ वाजताप्रात:स्वरसादरकर्त्या- मंजुषा पाटील, सावनी शेेंडेस्थळ- महाकवी कालिदास रंगमंच

टॅग्स :९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनमराठीमहाराष्ट्र