बीएस्सी आयटी सत्र पाचमध्ये ९६.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST2021-02-16T04:08:09+5:302021-02-16T04:08:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या बीएस्सी आयटी सत्र ५ या परीक्षेचा ...

बीएस्सी आयटी सत्र पाचमध्ये ९६.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या बीएस्सी आयटी सत्र ५ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ९६.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. ९ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. एकूण ८,४५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विद्यापीठाने आर्किटेक्चर चौथे वर्ष, एमएमएस सीबीएसजीएस सत्र ४, एमएमएस चॉईस बेस सत्र ३, एमएमएस चॉईस बेस सत्र ४, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट चॉईस बेस सत्र ३, बीई प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सत्र ७ चॉईस बेस व बीएस्सी आयटी सत्र ५ अशा ७ परीक्षांचे निकाल जाहीर केले.