सहा मतदारसंघात 96 अर्ज
By Admin | Updated: September 27, 2014 23:06 IST2014-09-27T23:06:37+5:302014-09-27T23:06:37+5:30
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 96 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

सहा मतदारसंघात 96 अर्ज
>दिपक मोहिते ल्ल वसई
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 96 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. सर्वाधिक 26 उमेदवारी अर्ज विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सादर झाले.
सात दिवसापूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. परंतु पहिल्या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. पितृपक्ष संपल्यानंतर मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामास वेग आला. घटस्थापनेच्या दिवसानंतर मात्र सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली. गेल्या दोन दिवसात 96 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये वसई येथे 13, नालासोपारा - 12, डहाणू - 18, विक्रमगड - 26, बोईसर - 15 व पालघर - 12 यांचा समावेश आहे. अर्ज मागे घेण्याच्या 1 ऑक्टो. या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. या 96 उमेदवारांमध्ये अनेक राजकीय पक्षाने डमी उमेदवारांचे अर्जही दाखल केले आहेत. अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरल्यानंतर डमी उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. त्यामुळे उमेदवारांची संख्या 35 ते 4क् इतकी राहील असा अंदाज आहे. या 96 उमेदवारांमध्ये 4क् हून अधिक अर्ज अपक्ष उमेदवारांचे आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकामध्ये उमेदवारांची संख्या अतिशय कमी होती. परंतु यंदा युती व आघाडी संपुष्टात आल्यामुळे उमेदवारांच्या अपेक्षा वाढल्या व सहा मतदारसंघात उमेदवारी अर्जाचे उच्चांक गाठला. अतिग्रामीण मतदारसंघ म्हणून ओळख असणा:या विक्रमगड मतदारसंघात यंदा सर्वाधिक उमेदवारी अर्ज आले. यामध्ये अपक्ष उमेदवारांचा भरणा अधिक आहे. राष्ट्रीय पक्षातील हाणामा:यामुळे मतविभागणी होऊन आपल्याला संधी मिळू शकते अशा भावनेतूनच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी कधी निवडणूक न लढवणारेही यंदा आपले नशीब आजमावीत आहेत. सुशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणा:या वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची संख्या इतर चार विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. हे चित्र लक्षात घेता ग्रामीण भागातही राजकारणामध्ये सहभागी होणा:यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकासंदर्भात गेल्या 5 वर्षात केलेल्या जनजागृतीने हा परिणाम जाणवत आहे. मतदानाच्या टक्केवारीतही सतत वाढ होत आहे. असे असले तरी दुसरीकडे नवशे-गवशे- हौशे यांचीही भरताड आहे.
पालघरमध्ये चौदा उमेदवारी अर्ज
विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर 14उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या तीन टर्मच्या माजी आमदार असलेल्या मनिषा निमकर यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर डमी उमेदवार म्हणून परशुराम निकोले, भाजपाकडून डॉ. प्रेमचंद गोंड तर डमी म्हणून अरूण जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जगन्नाथ वरठा तर डमी म्हणून जालीम तडवी तर शिवसेनेच्या जिल्हापरिषद सदस्या स्मिता कामद-पवार यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून तर त्याचे पती कामद पवार यांनी डमी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या वतीने माजी आ. कृष्णा घोडा तर राष्ट्रवादीच्या महेश रावते ,राजेंद्र गावित आाणि चंद्रकांत वरठा आणि सखाराम गडद अपक्ष आणि विलास दुमडा भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी अर्ज दाखल केले.
विक्रमगडमधून 21 उमेदवार
मोखाडा : विक्रमगड विधानसभेसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष मिळून एकुण 21 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे सुनिल भुासारा आणि शिवसेनेचे प्रकाश निकम या उमेदवारांनी जव्हार बाजारपेठेतून भव्य रॅली काढीत हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केले आहे. विक्रमगड विधानसभेसाठी एकूण 46 उमेदवारी अर्जाची विक्री झाली होती. यामध्ये शेवटच्या दिवस अखेर 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल भुसारा, शिवसेनेचे प्रकाश निकम, काँग्रेस आय चे अशोक पाटील, मनसेचे भरत हजारे, बहुजन समाज पार्टीचे मोहन गुहे, यासह अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
बोईसरला पंधरा उमेदवार अर्ज
4विधानसभेच्या बोईसर विधानसभेच्या निवडणुकीकरीता आज शेवटच्या दिवशी एकूण दहाजणांनी उमेदवारी अर्ज भरल्याने अर्जाची एकूण संख्या पंधरा झाली आहे.
4बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आ. विलास तरे यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर कैलास तरे (बविआ), गणोश दुमाडा (अपक्ष), विष्णु पाडवी (अपक्ष), वनगा (भाकप), परशुराम चावरे (अपक्ष), कमळाकर दळवी (शिवसेना), श्याम गवारी (बसपा), जगदीश धोडी (भाजपा), शंकर बसवत (अपक्ष-भाजपा डमी) वसंत रावते (मनसे) भूपेंद्र मढवी (काँग्रेस) सागर सूर (मनसे-डमी) तुळशीराम लहाने (समता सेना) सुनिल धानवा (अपक्ष) अशा पंधरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
4 राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडीला पाठींबा देणार म्हणून अर्ज दाखल न केल्याची चर्चा आहे.