92-year-old grandmother from Ghatkopar defeated Kelly Corona | घाटकोपर येथील ९२ वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात

घाटकोपर येथील ९२ वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्णही बरे होत आहेत. त्यातच गुरुवारी घाटकोपरच्या रहिवासी असणाऱ्या ९२ वर्षांच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. करोनामुक्त झालेल्या या आजींना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

डॉक्टर, परिचारिका आणि मेडिकल स्टाफ यांनी योग्य प्रकारे आजींवर उपचार केले. आणि आता या आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत. या आजींना डिस्चार्ज देताना, सर्व मेडिकल स्टाफ उपस्थित होता. सर्वांनी टाळ्या वाजवून आजींचे अभिनंदन केले. आजींना अचानक खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, एकंदर लक्षणे पाहून कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना कोहिनूर रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले.

आजींच्या घरातील त्यांच्या दोन केअरटेकरपैकी एकाला कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनी आजींनाही लक्षणे दिसायला लागली, अशी माहिती त्यांचा नातू गौरव मथुरावाला यांनी दिली. आजींनी दाखवलेल्या हिमतीमुळे आणि त्या उपचाराला साथ देत होत्या त्यामुळेच त्या लवकर ब-या झाल्या, असे डॉ. चेतन वेलांनी यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 92-year-old grandmother from Ghatkopar defeated Kelly Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.