अपघाती मृत्यूमध्ये पादचारी, दुचाकीस्वारांचे ९० टक्के प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:20+5:302021-02-05T04:32:20+5:30

मुंबईतील चित्र : सर्व पादचारी पथ मोकळे करणे गरजेचे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात ...

90% of pedestrians and two-wheelers in accidental deaths | अपघाती मृत्यूमध्ये पादचारी, दुचाकीस्वारांचे ९० टक्के प्रमाण

अपघाती मृत्यूमध्ये पादचारी, दुचाकीस्वारांचे ९० टक्के प्रमाण

मुंबईतील चित्र : सर्व पादचारी पथ मोकळे करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. पण गेल्या काही वर्षात मुंबईत अपघाती मृत्यूमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

याबाबत अविनाश ढाकणे म्हणाले की, शहरात एकूण ९० टक्के रस्ते अपघात मृत्यूमध्ये पादचारी, दुचाकीस्वार आणि सायकलस्वार यांचा समावेश आहे. ते म्हणाले, २०१५ पासून पादचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये ४० टक्क्यांनी घट झाली असली, तरी रस्त्यावर मोठा गट अपघाती मृत्यूचा बळी ठरत आहे. मृत्यू कमी करण्यासाठी वेग व्यवस्थापन आणि पादचारी पायाभूत सुविधा सुधारणा महत्त्वाच्या आहेत. रस्त्यावर पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. स्थानिक सरकारने त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली पाहिजे. सर्व पादचारी मार्ग मोकळे असले पाहिजेत आणि लोकांना अधिक चालण्यासाठी आणि कमी रस्ते वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.

जर चांगले फूटपाथ असतील तर वाहनांचा वापर कमी होईल. आज रस्त्यावरून चालणे धोकादायक आहे, त्यामुळे लोक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ऑटोरिक्षा घेतात. जर चांगले फूटपाथ असतील तर ते अंतर पार करण्यासाठी चालण्यास प्राधान्य दिले जाईल. ज्यामुळे चांगले आरोग्य, रस्त्यावर वाहनांचा कमी वापर, कमी प्रदूषण आणि पादचाऱ्यांना होणारे अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले.

वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात १,३२४ अपघात प्रवणक्षेत्र असून त्यापैकी ५८ अपघातप्रवण क्षेत्र मुंबईत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलीस (शहर आणि महामार्ग) अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे.

- अविनाश ढाकणे ,परिवहन आयुक्त

अहवाल लवकरच सादर

मुंबईत युनायटेड वे मुंबईतर्फे कोणत्याही तासाला आणि वेगात किती वाहने येतात हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. लवकरच अंतिम अहवाल सादर करण्यात येईल असे युनायटेड वे मुंबईचे संचालक अजय गोवले यांनी सांगितले

मुंबईत अपघाती मृत्यू

वर्ष -पादचारी- दुचाकी - चारचाकी- सायकल

२०१९- २१०-१८३-४५-९

२०१८- २४३-१९४-३२-६

२०१७- २५७-१८९-३६-८

२०१६-२९४-१७८-८५-८

२०१५ -३४९-२०८-४३-६

वर्ष-अपघात- मृत्यू- जखमी

२०१९ - २८७२-४४७-२९२५

२०२०-१७७६-२९९-१७३६

डिसेंबर महिन्यातील अपघात

वर्ष-अपघात- मृत्यू- जखमी

२०१९ - २५२-३४-२६७

२०२०-१८६-३५-१४७

Web Title: 90% of pedestrians and two-wheelers in accidental deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.