नवी मुंबईत ९० इमारती धोकादायक
By Admin | Updated: June 25, 2015 02:57 IST2015-06-25T02:57:51+5:302015-06-25T02:57:51+5:30
महापालिकेने ९० धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर पुढील एक-दोन दिवसांत ती जाहीर करण्यात येणार असल्याची

नवी मुंबईत ९० इमारती धोकादायक
नवी मुंबई : महापालिकेने ९० धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर पुढील एक-दोन दिवसांत ती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागातील सूत्राने दिली.
प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात धोकादायक वास्तूंची यादी प्रसिध्द केली जाते. मात्र यावर्षी प्रशासनाकडून दिरंगाई झाली आहे. याला विभाग अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. कारण विभाग अधिकाऱ्यांनी स्वत:च्या सहीने धोकादायक इमारतींची यादी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवून दिली होती. मात्र विभाग अधिकाऱ्यांना एखादी वास्तू धोकादायक ठरविण्याचा किंवा त्याविषयी अहवाल देण्याचा अधिकार नसल्याने ही यादी पुनरावलोकनासाठी परत पाठविण्यात आली होती. तसेच अभियांत्रिकी विभागाचा अभिप्राय घेऊन सुधारित यादी पाठविण्याच्या सूचना संबंधित विभागाने वॉर्ड अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ९० धोकादायक वास्तूंची सुधारित यादी तयार करून अभियांत्रिकी विभागाच्या अभिप्रायासह ती संबंधित विभागाकडे पाठविण्यात आली आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मान्यतेने पुढील एक दोन दिवसांत ती प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती सूत्राने दिली. (प्रतिनिधी)