Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रधानमंत्री इंटर्नशिप’द्वारे युवकांना ९ हजार विद्यावेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:41 IST

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेमार्फत विद्यावेतनाची रक्कम उमेदवारांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. तसेच, त्यांना जीवन व अपघात विमा संरक्षण, विशेष अनुदानाच्या स्वरूपात ६ हजारांची मदतही दोन टप्प्यांत दिली जाते.

मुंबई : विद्यार्थी व बेरोजगार तरुणांना उद्योग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम शिकून उत्पन्न मिळवण्याची संधी देणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप मिळत असून त्यासाठी त्यांना दरमहा नऊ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. मुंबई शहर व उपनगरातील १२१ आस्थापनांतील ४,८४४ रिक्त पदांसाठी १०,६९३ उमेदवार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यापैकी ९२ जण इंटर्नशिपसाठी रुजू झाले आहेत.

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेमार्फत विद्यावेतनाची रक्कम उमेदवारांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. तसेच, त्यांना जीवन व अपघात विमा संरक्षण, विशेष अनुदानाच्या स्वरूपात ६ हजारांची मदतही दोन टप्प्यांत दिली जाते. १८ ते २५ वयोगटातील किमान दहावी उत्तीर्ण ते पदवीधर भारतीय युवक या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, ते पूर्ण वेळ नोकरी करणारे नसावे, अशी उमेदवारांसाठी

अट आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. नोंदणी पूर्ण झाल्यावर नामांकित कंपनीतील रिक्तपदांसाठी अर्ज करता येतो. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई कार्यालयात संपर्क साधू शकता.

युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून त्यांच्यातील कौशल्य विकास वाढत आहे. त्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ होऊन शिक्षण व उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवातील दरी कमी करण्याच्या या योजनेमुळे पात्र युवक आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करत आहेत.

शैलेश भगत, साहाय्यक आयुक्त

English
हिंदी सारांश
Web Title : PM Internship: ₹9,000 Stipend Opportunity for Youth

Web Summary : The PM Internship offers ₹9,000 stipend to youth for 6-9 months in industries. Open to 10th pass to graduates (18-25 years), it provides experience, skill development, and career foundation with direct bank stipend and insurance. Apply online and contact Mumbai's employment center.