बीडीडी चाळीतील दगडफेकप्रकरणी ९ जणांना अटक
By Admin | Updated: April 13, 2017 00:54 IST2017-04-13T00:54:41+5:302017-04-13T00:54:41+5:30
वरळीच्या बीडीडी चाळींमध्ये नशा करणाऱ्या गर्दुल्ल्यांना हटकल्याच्या रागात त्यांनी रहिवाशांवर दगडफेक केली. यात तीन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे.

बीडीडी चाळीतील दगडफेकप्रकरणी ९ जणांना अटक
मुंबई : वरळीच्या बीडीडी चाळींमध्ये नशा करणाऱ्या गर्दुल्ल्यांना हटकल्याच्या रागात त्यांनी रहिवाशांवर दगडफेक केली. यात तीन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे.
एम. जी. भोसले मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक १४ आणि १५मध्ये सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास नशेखोरांनी दगडफेक केली. यात सचिन वाघमारे (३९), राहुल त्रिभुवन (२५) आणि सोनिया साळवी (२१) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच अहसान अली, असदुल्ला शेख, उमेर शेख, अश्फाक, अफजल, बाबू शेख, अली, नावेद, करण घोडके यांना अटक करण्यात आली . फरार आरोपींचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)