मालाडमधून ९ लाख ४५ हजारांचा गांजा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:06 IST2021-03-17T04:06:13+5:302021-03-17T04:06:13+5:30
भाजी विक्रेत्याला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाडमधील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवशक्ती चाळ येथील श्रीरामनगर स्मशानभूमीसमोर एक ...

मालाडमधून ९ लाख ४५ हजारांचा गांजा हस्तगत
भाजी विक्रेत्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाडमधील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवशक्ती चाळ येथील श्रीरामनगर स्मशानभूमीसमोर एक जण गांजा विक्री तसेच साठा करीत असल्याची गोपनीय माहिती कुरार पोलीस ठाण्याचे निरीक्षक चाळके यांना सूत्राकडून मिळाली हाेती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून सचिन साळुंखे (२८) या भाजी विक्रेत्याला अटक केली. त्याच्याकडून ६३ किलो गांजा त्यांनी हस्तगत केला. ज्याची बाजारातील किंमत ९ लाख ४५ हजार रुपये असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पितळे, सहायक पोलीस निरीक्षक भोये आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. साळुंखे हा श्रीरामनगरमध्ये राहत असून त्याने गांजा कुठून आणला तसेच त्याचे कोणी साथीदार आहेत का, याबाबत चौकशी सुरू आहे.