जिल्ह्यात ९४४० मतदान यंत्रांचा वापर होणार!

By Admin | Updated: October 14, 2014 23:16 IST2014-10-14T23:16:17+5:302014-10-14T23:16:17+5:30

विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १८ मतदारसंघांमध्ये २३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवाराना ५९ लाख ९० हजार ७६७ मतदार सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत

9 440 voting machines will be used in the district! | जिल्ह्यात ९४४० मतदान यंत्रांचा वापर होणार!

जिल्ह्यात ९४४० मतदान यंत्रांचा वापर होणार!

ठाणे : विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १८ मतदारसंघांमध्ये २३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवाराना ५९ लाख ९० हजार ७६७ मतदार सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. यासाठी नऊ हजार ४४० मतदान यंत्र (बॅलेट युनिट) व ८३०० कंट्रोल युनिट वापरले जाणार आहेत.
जिल्ह्यात २३८ उमेदवार नशीब अजमावत आहेत. या उमेदवारासाठी सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एका मतदार यंत्रावर १५ उमेदवारांना मतदान करण्याची व्यवस्था आहे. यानुसार जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील १४ मतदार संघात १५ किंवा त्यापेक्षा कमी उमेदवार आहेत. यामुळे या ठिकाणी एक मतदान यंत्र वापरले जाणार आहे. उर्वरित कल्याण (प) मतदार संघात १७ उमेदवार असून अंबरनाथमध्ये देखील १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय उल्हासनगरमध्ये सर्वाधिक २२ उमेदवार आहेत तर मुंब्रा-कळवा मतदारसंघात १७ उमेदवार असल्यामुळे या मतदार संघातील मतदान केंद्रांवर दोन मतदान यंत्रे वापरले जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 9 440 voting machines will be used in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.