Join us  

राज्यातील ९१ मच्छीमार बंदरांची सुरक्षा वाऱ्यावर, आदेश कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 5:19 AM

नौदलाच्या इशाऱ्याकडे कानाडोळा; अतिरेकी कारवायांचा धोका कायम

- नारायण जाधव ठाणे : काश्मीर येथील पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देशभर सतर्कचे इशारा दिलेला असतांनाच नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी देशात समुद्री मार्गाने अतिरेकी हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे. यापूर्वी २००८ च्या २६ नोव्हेंबर रोजी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सागरकिनाºयावरील ५२५ मासेमारी बंदरांपैकी मुंबईच्या बधवार पार्क, गोराई-मनोरी, वाशी खाडीपूल, उत्तन, रेवस, मांडवा, दाभोळ, मालवणसह ९१ बंदरे अतिसंवेदनशील आढळली होती. मात्र, आजही या बंदरांवर पाहिजे तशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास महाराष्ट्र शासनाने कानाडोळा केल्याचे दिसत आहे.२६/११ च्या हल्ल्यानंतर संभाव्य धोके टाळण्यासाठी या बंदरांवर गुजरात आणि तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर या बंदरांवर येणाºया मासेमारी नौकांसह खलाशांची नोंद ठेवण्यासाठी नौदल आणि गृह विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या मत्स्यविकास विभागाने -जुलै- आॅगस्ट २०१५ मध्ये टोकन पद्धत राबवून २४ तास तीन पाळ्यांत सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २७९ सुरक्षारक्षकांसह २३ पर्यवेक्षक असे ३०२ सुरक्षा कर्मचारी येथे नेमण्याचे ठरविले होते. परंतु, त्याचे पालन न झाल्याने तुरळक अपवाद वगळता सध्याही या बंदरांची सुरक्षा वाºयावरच दिसत आहे.२६/११ नंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली होती. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले होते. यातील ५६ पॉइंट्स मत्स्यविकास विभागाच्या अखत्यारीत येतात, तर ३५ लँडिंग पॉइंट्सवर मासळी उतरवली जात नाही. मात्र, या सर्व ९१ मच्छीमार बंदरांवर कडक सुरक्षा तैनात करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नौदलाने नोंदविले होते.ही बंदरे आहेत अतिसंवेदनशीलमुंबई : बधवार पार्क, गणेशमूर्तीनगर, गीतानगर, गोराई, मनोरी, बांद्रे सागरी सेतू जेट्टी, सांताक्रूझ जेट्टी, वर्सोवा, पिरवाडी, माणिकटोक ठाणे जिल्हा : उत्तन, दिवाळे, बेलापट्टी, पाली, वाशी ब्रिज, सारसोळे. पालघर जिल्हा : नरपाडा-डहाणू, गुंगवाडा-धाकटी डहाणू, वरोर, तडीयाळ, कंबोडे, घिवलीगाव, रानगाव, वसई-बॅसिन, खोचिवडे, पाचूबंदर, पाणजू, भुईगाव, कोल्लार, सुरूचीबाग, अर्नाळा, वैतरणा, मारबंळपाडा, रायगड जिल्हा : मांडवा, रेवस, जुनी आरसीएफ जेट्टी, थळनवगाव, अलिबाग चौपाटी, रेवदंडा ब्रिज-१, रेवदंडा ब्रिज-२, साळाव, नांदगाव, मुरूड खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी पोर्ट जेट्टी, दिघी पॅसेंजर जेट्टी, शेखाडी, जीवनाबंदर, बागमांडला, मांदाड-१, दादर, आंबेत, रत्नागिरी जिल्हा : वेशवी, वेळास, केळशी, दाभोळ, वेलदूर, रानवी, पडवे, जयगड, नांदिवडे, सैतवडे, जांभारी, गणपतीपुळे, काळबादेवी, रनपार-घोळप, पूर्णगड, मिºया, भगवती बंदर, नेवरे, कुर्ले, साखरी नाटे, मुसाकाझी, अंबोळगड, माडबन, सिंधुदुर्ग जिल्हा : मीठमुंब्री-तारांबुरी, कुणकेश्वर, काटवन, तांबडडेग, सर्जेकोट-मिºयाबाद, तारकर्ली-काळेथर, मालवण जेट्टी, खवणे, वेंगुर्ला, मोचेमाड, आरवलीटाक, तेरेखोल, देवगड, गजबादेवी.नौदलप्रमुखांच्या इशाºयाने सुरक्षा ऐरणीवर : या बंदरांवर ये-जा करणाºया नौकांचे अवागमन, कागदपत्रांची तपासणी आणि खलाशांची नोंद ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, मासेमारीस जाणाºया नौकेची, तिच्यावरील खलाशांची नोंद घेऊन त्यांना एक टोकन देण्यात येणार होते. सदर नौका परत बंदरात आल्यावर त्यांना हे टोकन परत करावे लागणार होते. यातून प्रत्येक नौकेची हालचाल टिपून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सागरी पोलीस, मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत करणे सक्तीचे केले होते. परंतु, राज्य शासनाचा हा आदेश कागदावरच दिसत आहे. मात्र, नौदलप्रमुख सुनील लांबा यांच्या इशाºयानंतर या बंदराची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

टॅग्स :भारतीय नौदलमहाराष्ट्र