मुंबई : पतपेढीत गुंतवणूक केल्यास १८ टक्क्यांनी परतावा देण्याच्या आमिषाने मामानेच ८८ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे २०१३ पासून गुंतवणूक करत असलेली पतपेढी अस्तित्वात नसल्याचे समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दादर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश गुप्ता हे दादर परिसरात सॅण्डवीच विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी २०१३ पासून चुलत मामा परमेश गुप्ता (वय ४८) याच्याकडे गुंतवणूक सुरू केली. परमेश हा ‘जनसहयोग ग्रुप फायनान्स’ नावाची पतपेढी चालवीत असून, दरवर्षी १८ टक्के परतावा देत असल्याचे त्याने सांगितले. नातेवाईक असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून दिनेश यांनी २०१३ ते २०१९ दरम्यान टप्प्याटप्प्याने ४२ लाख रुपये दिले. ऑगस्ट २०१९ मध्ये वडिलोपार्जित दुकान विक्रीनंतर मिळालेली ३० लाखांची रक्कमही त्यांनी पत्नीच्या नावाने गुंतविली. अशा प्रकारे एकूण ८८ लाखांची गुंतवणूक त्यांनी केली. सुरुवातीला कोणतीही अधिकृत पावती दिली नव्हती. मात्र, १ जानेवारी २०१९ रोजी मुदतठेव पावती देऊन १८ टक्के व्याजासह परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले.
८४ लाख रुपयांचा अपहार
फसवणूक झाल्याचे समजताच दिनेश यांनी दादर पोलिसांत तक्रार केली. २०१३ ते २०२५ या कालावधीत विश्वास संपादन करून ८८ लाख रुपये स्वीकारून त्यापैकी केवळ चार लाख परत देत उर्वरित ८४ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धनादेश बाउन्स झाल्याने पोलखोल
स्टॅम्प पेपरवर सामंजस्य करारदेखील करण्यात आला. त्यानुसार चार लाख रुपये देण्यात आले, तर उर्वरित रकमेसाठी धनादेश दिले.
पत्नीच्या नावाचा ३८ लाख रुपयांचा धनादेश २९ डिसेंबर २०२५ रोजी बँकेत जमा केला असता ३१ डिसेंबरला तो बाउन्स झाला.
संबंधित कार्यालयाचा शोध घेतला असता ‘जनसहयोग ग्रुप फायनान्स’ नावाची पतपेढी अस्तित्वात नसल्याचे समजल्याने त्यांना धक्का बसला.
Web Summary : A Mumbai man was defrauded of ₹88 lakhs by his uncle, who promised high returns from a fake credit society. The victim invested over several years, only to discover the society didn't exist when a cheque bounced. Police are investigating the fraud.
Web Summary : मुंबई में एक व्यक्ति को उसके मामा ने फर्जी क्रेडिट सोसाइटी में निवेश कराकर ₹88 लाख का चूना लगाया। पीड़ित ने कई वर्षों तक निवेश किया, लेकिन चेक बाउंस होने पर उसे पता चला कि सोसाइटी मौजूद ही नहीं है। पुलिस धोखाधड़ी की जांच कर रही है।