शिवसेनेचे ८८ नगरसेवक

By Admin | Updated: February 25, 2017 03:35 IST2017-02-25T03:35:04+5:302017-02-25T03:35:04+5:30

पालिका निवडणुकीत ८४ जागांवर यश मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर शिवसेनेची आगेकूच आता सुरु झाली आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या गोटात एकाच दिवसात ४

88 corporators of Shivsena | शिवसेनेचे ८८ नगरसेवक

शिवसेनेचे ८८ नगरसेवक

मुंबई : पालिका निवडणुकीत ८४ जागांवर यश मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर शिवसेनेची आगेकूच आता सुरु झाली आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या गोटात एकाच दिवसात ४ नगरसेवक दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे बळ आता ८८ झाले आहे. भाजपानेही आपल्याकडे ४ आणखी नगरसेवक असल्याचे सुतोवाच काल केले होते. त्यामुळे प्रत्येक दिवसाला शिवसेना, भाजपाचा किती स्कोअर वाढतो, ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रभाग ४१ मधून बंडखोरी करुन शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणारे तुळशीराम शिंदे पुन्हा शिवसेनेत परतणार आहेत़मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहेत. तर शिवसेनेतून हकालपट्टी केलेले विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्या वहिनी स्नेहल मोरे देखील विजयी झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 88 corporators of Shivsena