मुंबई : गेल्या पाच महिन्यांत जवळपास तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)ने केली. त्यातील ४५ टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे आढळून आल्याचे धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे. तपासणी शिबिरादरम्यान तब्बल ८५ टक्के चालक हे तंबाखू सेवन करतात असे आढळून आले. त्यात प्लाकिया, सब म्युकस फायब्रॉसीस, बायोप्सी, एफएनएसी या रोगांचा समावेश आहे.शहर उपनगरांतील अनेक परिसरांत तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यात कुर्ला, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव आणि मालाड अशा विविध परिसरांचा समावेश आहे. या शिबिरांमध्ये कान, नाक, घसा आणि दातांचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. रिक्षाचालकांना तंबाखू सेवनाची जी सवय लागते, ती अनेक कारणांमुळे लागल्याचे आढळून आले. व्यावसायिक ताणतणाव, भूक मारली जाणे, व्यसने, प्रदूषणाचा त्रास आणि आपल्या कुटुंबापासून आलेले दुरावलेपण या कारणांमुळे तंबाखू सेवनाची सवय रिक्षाचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते, असे निरीक्षण सर्वेक्षणाअंती नोंदविण्यात आले आहे.
८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन; कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 04:35 IST