माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध १० वर्षांत ८४ खटले

By Admin | Updated: July 14, 2015 01:36 IST2015-07-14T01:36:34+5:302015-07-14T01:36:34+5:30

गेल्या दहा वर्षांत राज्य माहिती आयोगाने जारी केलेल्या आदेशाविरुद्ध न्यायालयात आत्तापर्यंत तब्बल ८४ प्रकरणांत खटले दाखल करण्यात आले आहेत.

84 cases in 10 years against the order of Information Commission | माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध १० वर्षांत ८४ खटले

माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध १० वर्षांत ८४ खटले

मुंबई : गेल्या दहा वर्षांत राज्य माहिती आयोगाने जारी केलेल्या आदेशाविरुद्ध न्यायालयात आत्तापर्यंत तब्बल ८४ प्रकरणांत खटले दाखल करण्यात आले आहेत. यात एकाच प्रकरणात माहिती आयोगाला न्यायालयीन लढाईत यश मिळाल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आली. ८४पैकी ३ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातील आहेत. २०१३ मध्ये २४ तर २०१४ मध्ये २३ प्रकरणे दाखल झाली. राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशाविरुद्ध गृह खाते, मुंबई विद्यापीठ, रिलायन्स एनर्जी, मुंबई महापालिका, पोलीस खाते, एस.डी. कॉर्पोरेशनसारख्या एजन्सींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 84 cases in 10 years against the order of Information Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.