जिल्हय़ात 801 वॉरंट

By Admin | Updated: October 4, 2014 23:08 IST2014-10-04T23:08:25+5:302014-10-04T23:08:25+5:30

ज्या समाजकंटकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी व्यापक अशी मोहीम हाती घेतली आहे.

801 warrant in the district | जिल्हय़ात 801 वॉरंट

जिल्हय़ात 801 वॉरंट

>ठाणो :  ज्या समाजकंटकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी व्यापक अशी मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेद्वारे ठाणो जिल्ह्यातील 1 हजार जणांपैकी 8क्1 जणांना वॉरंट बजावल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये आणि निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी खबरदारी म्हणून त्या समाजकंटकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. अशा प्रकारे नॉन-बेलेबल वॉरंट बजावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक वॉरंट ठाणो शहर पोलिसांनी काढून ते बजावले आहेत. या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळे असून 33 पोलीस ठाणी आहेत. त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 7क्9 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात वॉरंट काढून त्यापैकी 577 जणांना वॉरंट बजावण्यात आले असून 132 जणांना बजावले जाणार आहे.  ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रत चार विभाग आहेत. त्यामध्ये 15 पोलीस ठाणी असून त्या ठाण्याच्या हद्दीमधील 155 जणांविरोधात वॉरंट काढण्यात आले आहे. त्यापैकी 89 जणांना बजावले असून उर्वरित 66 जणांना बजावण्यात येणार आहे. 
मात्र, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दोन परिमंडळे असून त्यामध्ये 18 पोलीस ठाणी आहेत. त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 136 जणांविरोधात वॉरंट जारी केले असून त्यापैकी 135 जणांना ते बजावले आहे. त्यातील एकालाच वॉरंट बजावणो बाकी असल्याची माहिती सूत्रंनी दिली़
 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दोन परिमंडळे असून त्यामध्ये 18 पोलीस ठाणी आहेत. त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 136 जणांविरोधात वॉरंट जारी केले असून त्यापैकी 135 जणांना ते बजावले आहे. त्यातील एकालाच वॉरंट बजावणो बाकी आहे.

Web Title: 801 warrant in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.