८० टक्के रुग्णांमध्ये नाहीत कोरोनाची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:37 AM2020-06-01T00:37:53+5:302020-06-01T00:38:01+5:30

महापालिकेचा निष्कर्ष : रुग्णालयातील माहितीला तज्ज्ञांचा आधार

80% of patients do not have corona symptoms | ८० टक्के रुग्णांमध्ये नाहीत कोरोनाची लक्षणे

८० टक्के रुग्णांमध्ये नाहीत कोरोनाची लक्षणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांनी कोरोनाचा धसका घेतला असतानाच नुकतेच हाती आलेल्या एका माहितीनुसार, एकूण रुग्णांपैकी ७५ ते ८० टक्के कोरोनाबाधित रुग्ण एक तर सौम्य बाधा असलेले आहेत. किंवा त्याच्यात लक्षणे आढळत नाहीत.


१५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची तर ५ ते ७ टक्के व्यक्तींमध्ये अत्यवस्थ लक्षणे आणि सोबत आजार आढळून येतात. परिणामी सौम्य, मध्यम बाधा असलेले रुग्ण बरे होतात. शिवाय बरेचसे गंभीर आजार असलेले रुग्णही बरे होतात.


विविध रुग्णालयांकडून प्राप्त माहितीस तज्ज्ञांच्या निरीक्षणांती मुंबई महापालिकेने हा निष्कर्ष काढला आहे.
मुंबईकरांनी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घाबरू नये. जर कोणतीही लक्षणे नसतील.


कोणतेही इतर आजार नसतील. सौम्य स्वरूपाची लक्षणे असतील तरीही योग्य सुविधा उपलब्ध असल्यास घरी अलगीकरण राहून केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या सूचनांचे पालन करत घरातच थांबू शकता. जर संबंधित रुग्णाला घरी अलगीकरण करण्यायोग्य सुविधा उपलब्ध नसतील तर त्यांना कोरोना काळजी केंद्रात आरोग्य खात्याच्या मार्गदर्शनानुसार दाखल करता येते, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

Web Title: 80% of patients do not have corona symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.