पालिकेत नोकरीसाठी गमवले ८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:06 IST2021-01-22T04:06:43+5:302021-01-22T04:06:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ठगाने एका कुटुंबीयांना ८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. ...

8 lakh lost for a job in the corporation | पालिकेत नोकरीसाठी गमवले ८ लाख

पालिकेत नोकरीसाठी गमवले ८ लाख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ठगाने एका कुटुंबीयांना ८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

तक्रारदार ताडदेव परिसरात राहत असून, ते पालिकेत नोकरीला आहेत. त्यांच्या बहिणीलाही पालिकेत नोकरी लावून देण्यासाठी ते प्रयत्न करत होते. अशातच कुणाल जोगदिया नावाची व्यक्ती मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नोकरी लावून देत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कुणालशी संपर्क साधल्यावर त्याने पालिकेत पी.टी. केसमध्ये मुंबई नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी तक्रारदाराकडून ८ लाख रुपये उकळले. पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत विचारणा करताच कुणाल टाळत असल्याचे लक्षात आले, तसेच त्याने आणखीही काही तरुणांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचेही त्यांना समजले. त्यांनी ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Web Title: 8 lakh lost for a job in the corporation