दादरमध्ये ८ लाखांच्या दागिन्यांची लूट

By Admin | Updated: December 7, 2015 01:45 IST2015-12-07T01:45:54+5:302015-12-07T01:45:54+5:30

वडिलांसोबत सासरी जात असलेल्या तरुणीला धक्का देऊन अज्ञात लुटारूंनी तरुणीकडील ८ लाखांचा ऐवज भररस्त्यात लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री दादरच्या शिवाजी पार्क परिसरात घडली.

8 lakh jewelery robbery in Dadar | दादरमध्ये ८ लाखांच्या दागिन्यांची लूट

दादरमध्ये ८ लाखांच्या दागिन्यांची लूट

मुंबई : वडिलांसोबत सासरी जात असलेल्या तरुणीला धक्का देऊन अज्ञात लुटारूंनी तरुणीकडील ८ लाखांचा ऐवज भररस्त्यात लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री दादरच्या शिवाजी पार्क परिसरात घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
चांदणी जैन असे या तरुणीचे नाव असून, ती शिवाजी पार्क परिसरात राहते. रात्री ११च्या सुमारास ती तिच्या वडिलांसोबत जात होती. दरम्यान, कृष्णकुंज इमारतीजवळ अचानक दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले. त्यांनी या तरुणीला धक्का देत तिच्या खांद्यावर अडकवलेली पर्स घेत पोबारा केला. या पर्समध्ये तरुणीचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण ८ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज होता. (प्रतिनिधी)

Web Title: 8 lakh jewelery robbery in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.