विक्रमगड शहरात आठ तास वीज गायब; व्यवहार ठप्प

By Admin | Updated: June 13, 2014 00:03 IST2014-06-13T00:03:40+5:302014-06-13T00:03:40+5:30

पावसाळा सुरु व्हायच्या आधीच विक्रमगड व परिसरातील वीज बुधवारी तब्बल आठ तास गायब झाली होती. सकाळी ९.३० वाजता वीज गेली ती सायंकाळी ६ वाजता आली

8 hours power disappeared in Vikramgad city; Jam behavior | विक्रमगड शहरात आठ तास वीज गायब; व्यवहार ठप्प

विक्रमगड शहरात आठ तास वीज गायब; व्यवहार ठप्प

तलवाडा : पावसाळा सुरु व्हायच्या आधीच विक्रमगड व परिसरातील वीज बुधवारी तब्बल आठ तास गायब झाली होती. सकाळी ९.३० वाजता वीज गेली ती सायंकाळी ६ वाजता आली, त्यातही सातत्य नसल्याने वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या प्रकारात भरमसाट वाढ झाली आहे.
अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने उष्णतेमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. अंगाची लाही होत आहे. वीज नसल्याने जीव कसा कासाविस होतो आजारी रुग्णांना तर श्वास घेणे मुश्किल होत आहे. अगोदरच अन्यायकारक भारनियमन त्यात आठ तास वीज गायब व असलेल्या विजेतही सातत्य नसल्याने विक्रमगडमध्ये विजेचा प्रश्न जटील बनला आहे.
विक्रमगड व परिसरात अगोदरच भारनियमनाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे. आताही तीन वेळेत पहाटेपासून रात्रीपर्यंत भारनियमन चालूच आहे, तर विक्रमगड शहर परिसरात अनेक ठिकाणी वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार चालू आहेत. ग्रामस्थांमधून महावितरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: 8 hours power disappeared in Vikramgad city; Jam behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.