कोस्टल रोडवर ७७९ सूचना
By Admin | Updated: August 28, 2015 02:49 IST2015-08-28T02:49:55+5:302015-08-28T02:49:55+5:30
मुंबईच्या प्रस्तावित कोस्टल रोडवर मुदतीअखेर केवळ ७७९ सूचना-हरकती दाखल झाल्या आहेत. यात ई-मेलद्वारे दाखल झालेल्या पत्रांची संख्या ४०६, थेट पत्रांची संख्या ७७ असून, कोळी

कोस्टल रोडवर ७७९ सूचना
मुंबई : मुंबईच्या प्रस्तावित कोस्टल रोडवर मुदतीअखेर केवळ ७७९ सूचना-हरकती दाखल झाल्या आहेत. यात ई-मेलद्वारे दाखल झालेल्या पत्रांची संख्या ४०६, थेट पत्रांची संख्या ७७ असून, कोळी समाजाकडून दाखल झालेल्या पत्रांची संख्या २९६ आहे. महत्त्वाचे म्हणजे कोस्टल रोडला सर्व स्तरातून विरोध होत असतानाच एवढ्या कमी संख्येने सूचना-हरकती दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नरिमन पॉइंट येथून सुरू होणारा कोस्टल रोड ३५ ते ३६ किलोमीटरचा असून, तो कांदिवलीला जाऊन मिळणार आहे. त्यासाठी सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे शहरातील १८ ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार आहेत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र कोस्टल रोडमुळे पर्यावरणाची हानी होणार असून, त्याचा फटका कोळीवाड्यांना बसणार आहे, असा प्रतिवाद तज्ज्ञांनी केला होता.
परिणामी, मुख्यमंत्र्यांनी मुंबई सागरीकिनारा रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक करण्याचे व त्यावर नागरिकांच्या सूचना मागविण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने हा प्रस्ताव संकेतस्थळावर उपलब्ध करून देत सूचना मागविल्या होत्या. नागरिकांना सूचना पाठविण्यासाठी २७ आॅगस्ट ही मुदत देण्यात आली होती. यावर एकूण ७७९ सूचना-हरकती दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
$$्रिकाय आहे प्रस्ताव?
नरिमन पॉइंट येथून सुरू होणारा कोस्टल रोड ३५ ते ३६ किलोमीटरचा असून, तो कांदिवलीला जाऊन मिळणार आहे. त्यासाठी सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.