Join us

बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्टेशनचे ७६ टक्के खोदकाम पूर्ण; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रकल्पस्थळाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:03 IST

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पस्थळाला भेट दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पातील बीकेसी हे एकमेव भूमिगत स्टेशन असून, ते जमिनीपासून खाली २६ मीटर खोल बांधण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) स्टेशनचे काम वेगाने सुरू आहे. येथे एक जागतिक दर्जाचे स्टेशन बांधले जात असून, त्याची इमारत बहुमजली असेल. भूमिगत स्टेशनसाठी ७६ टक्के खोदकाम झाले आहे. स्टेशनच्या भिंतींचे कामही सुरू आहे. बोगद्यांची कामेही वेगाने पूर्ण होत आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली.

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पस्थळाला भेट दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पातील बीकेसी हे एकमेव भूमिगत स्टेशन असून, ते जमिनीपासून खाली २६ मीटर खोल बांधण्यात येत आहे. या स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर, असे तीन मजले आहेत. स्टेशनसाठी जमिनीखाली ३२ मीटर (सुमारे १०० फूट) खोल खोदकाम केले जात असून, ते अंदाजे १० मजली इमारतीच्या उंचीइतके आहे. या स्टेशनवर एकूण सहा प्लॅटफॉर्म असतील आणि प्रत्येक प्लॅटफॉर्म १६ डब्यांची बुलेट ट्रेन थांबेल इतके अंदाजे ४१५ मीटर लांब असणार आहे.

दोन प्रवेश-निर्गमन योजना या प्रकल्पात दोन प्रवेश-निर्गमन बिंदू असणार आहेत. त्यात एक मेट्रो मार्गिका ‘२ बी’च्या जवळच्या मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आणि दुसरा ‘एमटीएनएल’ इमारतीकडे. जेणेकरून प्रवाशांच्या हालचाली आणि सुविधांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. सध्या १४.२ लाख घनमीटर मातीचे उत्खनन पूर्ण झाले आहे. या जागेवरून एकूण १८ लाख ७२ हजार २६३ घनमीटर मातीचे उत्खनन करण्यात येणार आहे. 

स्टेशनच्या कामावर दृष्टिक्षेप खोदकाम काम - ७६ टक्के पूर्ण एकूण खोदकाम - अंदाजे १०० फूट (१० मजली इमारती एवढे) प्लॅटफॉर्म जमिनीखाली २६ मीटर खोल असेल.बीकेसी स्थानकावर बांधण्यात येणारे प्लॅटफॉर्म - ६ बुलेट ट्रेनचे डबे - १६ यंदाच्या अर्थसंकल्पात प्रकल्पाची तरतूद रक्कम - ४००४.३१ कोटी रुपये 

बीकेसी स्टेशन असे असेल पहिला तळमजला उपकरण कक्षदुसरा तळमजला बिझनेस क्लास लाउंजतिकीट खिडकी, टीव्हीएम आणि नागरिक सुविधा कक्षव्यावसायिक दुकानेतिसरा तळमजला ६ ट्रॅक प्लॅटफॉर्म ऑपरेशन्स रूमस्टेशन नियंत्रण कक्ष 

बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनच्या स्टेशनचे काम वेगाने सुरू आहे. या जागेवर एक जागतिक दर्जाचे स्टेशन बांधले जात आहे. सध्या भूमिगत स्थानकाच्या तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे.अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री.

टॅग्स :बुलेट ट्रेन