कर्जतमध्ये ७५.१ टक्के मतदान
By Admin | Updated: October 15, 2014 22:50 IST2014-10-15T22:50:26+5:302014-10-15T22:50:26+5:30
कर्जत मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४२ हजार ९९१ मतदार आहेत. सकाळी ३१0 मतदान केंद्रांवर मतदानाची अत्यंत धीम्या गतीने सुरुवात झाली

कर्जतमध्ये ७५.१ टक्के मतदान
कर्जत : कर्जत मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४२ हजार ९९१ मतदार आहेत. सकाळी ३१0 मतदान केंद्रांवर मतदानाची अत्यंत धीम्या गतीने सुरुवात झाली. पन्नास टक्के तरी मतदान होते की नाही अशी परिस्थिती होती. मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली व मतदान संपताना ७५.0१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये ९८,00४ पुरूष व ८४,२६३ महिला अशा एकूण १लाख ८२ हजार २६७ मतदारांचा सहभाग आहे.पोस्टल मतदान केंद्रावर ८४.९0 टक्के मतदान झाले. नेरळ शहरात साडेतीनच्या सुमारास ५२ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत होते तरी मतदान शांततेत झाले.
यंदा सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढले असल्याने मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढेल असे वाटले होते. सकाळी सात वाजता मतदानाची सुरुवात झाली तरी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. ११९ उमरोली मतदान केंद्रावरील यंत्रावर मतदान करताना त्रास होत होता, मत देताना उमेदवाराच्या नावासमोरील बटन तीन, चार वेळा दाबावे लागत होते. मात्र ही बाब लक्षात आल्यावर ते मतदान यंत्र बदलण्यात आले. सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ ६.६0 टक्के इतकेच झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.१२ टक्क्यांपर्यंत वाढली व ५ वाजण्याच्या सुमारास ७७,५४३ पुरुषांनी व ६८,४0३ महिला अशा १,४५,९४६ मतदारांनी ६0.0६ टक्के मतदानापर्यंत मजल मारली व मतदान संपले तेव्हा ७५.१ टक्के मतदान
झाले.