गणोशोत्सव काळात 721 टन निर्माल्य जमा
By Admin | Updated: September 14, 2014 01:18 IST2014-09-14T01:18:40+5:302014-09-14T01:18:40+5:30
महापालिका प्रशासनाने मुंबईच्या विविध विभागांतून गणोशोत्सवादरम्यान सुमारे 721 टन निर्माल्य जमा केले असून, त्याची विल्हेवाटही लावली जात आहे.

गणोशोत्सव काळात 721 टन निर्माल्य जमा
मुंबई : महापालिका प्रशासनाने मुंबईच्या विविध विभागांतून गणोशोत्सवादरम्यान सुमारे 721 टन निर्माल्य जमा केले असून, त्याची विल्हेवाटही लावली जात आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात गणोशोत्सव मोठय़ा धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असतानाच निर्माल्याचे समुद्र आणि तलावांत विसजर्न झाल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने निर्माल्य कलशातच टाकण्याचे आवाहन गणोशभक्तांना केले होते. त्यासाठी महापालिकेने समुद्र आणि तलाव या विसजर्नस्थळांवर निर्माल्य कलश ठेवले होते. शिवाय गणोशोत्सवादरम्यान तयार होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी मुंबईच्या 24 विभागांत वाहने तैनात करण्यात आली होती. ही सर्व वाहने सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाचे निर्माल्य गोळा करीत होती. शिवाय 72 विसजर्न स्थळांवर गणोशभक्तांसह नागरिकांनी आणलेले निर्माल्य गोळा करण्यासाठी वाहने तैनात करण्यात आली होती.
महापालिका प्रशासन गोळा केलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करणार असून, हे खत विविध उद्यानांसाठी वापरले जाणार आहे. शिवाय आवश्यक असल्यास नागरिकांनाही उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)
उमरखाडी 16, मुलुंड 23, वरळी ते लोअर परळ 79, भांडुप ते विक्रोळी 162, दादर, माहीम, धारावी 56, परळ ते लालबाग 81, वांद्रे ते सांताक्रुझ 3क्, गोरेगाव 43, गिरगाव 21, बोरीवली 19