Join us  

आता लोकलच्या धावणार ७०० फेऱ्या; बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:00 PM

अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे.

मुंबई :  मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गवरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १ जुलैपासून एकूण ७०० फेऱ्या धावणार आहेत. या फेऱ्या १५ ते २० मिनिटांच्या फरकाने धावतील. सर्व लोकल या १२ डब्यांच्या असून जलद मार्गावर धावणार आहेत. 

अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरून २०० आणि पश्चिम रेल्वे मार्गवरून 202 फेऱ्या आतापर्यत सुरू होत होत्या. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला अनुमती दिल्यामुळे उपनगरीय लोकल फेऱ्या वाढविण्यात आले आहे. ज्यामध्ये आता मध्य रेल्वे १५० अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गवर १४८ लोकल फेऱ्या वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गवर सोमावरपासून तब्बल आता ७०० लोकल फेऱ्या धावतील.त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य आणि पश्चिम लोकलमधून साधारण १ लाख २५ हजार कर्मचारी  प्रवास करू शकतील. एका लोकल मध्ये साधारण १ हजार २०० जण बसतात. मात्र फिजिकल डिस्टन्सच्या नियमामुळे ७०० कर्मचारी प्रवास करू शकतात. क्यू आर कोड राज्य सरकार देणार सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्राविना परवानगी दिली जाणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यू आर कोड राज्य सरकार देणार आहे.आयकर विभाग, बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, स्टॉक एक्सेंज कर्मचारी, राज भवन, जीएसटी आणि कस्टम कर्मचारी, सुरक्षा विभाग यांना परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसलोकलमुंबईकेंद्र सरकार