Join us  

Govandi Building Collapse :गोवंडीमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 10:35 AM

7 people injured, three died after a building collapsed in Govandi area of Mumbai : सात जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई - मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे पाच वाजता तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी सात जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

टॅग्स :मुंबईइमारत दुर्घटना