राज्यात ६,७४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:07 IST2021-07-07T04:07:23+5:302021-07-07T04:07:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. सोमवारी १३,०२७ रुग्ण बरे ...

6,740 new corona cases registered in the state | राज्यात ६,७४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात ६,७४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. सोमवारी १३,०२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ६,७४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १६ हजार ८२७ रुग्ण सक्रिय आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२७,१२,४६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,०४,९१७ (१४.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,४२,२५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title: 6,740 new corona cases registered in the state