राज्यात ६,७२७ नवीन रुग्णांचे निदान, १०१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST2021-06-29T04:06:22+5:302021-06-29T04:06:22+5:30

मुंबई : राज्यात सोमवारी ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू ...

6,727 new cases diagnosed in the state, 101 deaths | राज्यात ६,७२७ नवीन रुग्णांचे निदान, १०१ जणांचा मृत्यू

राज्यात ६,७२७ नवीन रुग्णांचे निदान, १०१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सोमवारी ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १७ हजार ८७४ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी, तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज १० हजार ८१२ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के इतके आहे.

Web Title: 6,727 new cases diagnosed in the state, 101 deaths