Join us  

अल्पवयीन मुलीचा वृद्धाकडून विनयभंग, ६५ वर्षीय व्यक्तीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:06 AM

सीमा (नावात बदल) ही १५ वर्षीय मुलगी अंधेरीच्या जे.बी. नगर परिसरात राहते. तिच्या आईचे आणि अटक केलेल्या राधेश्याम नायर यांचे राहत्या घरावरून गेली काही वर्षे वाद सुरू आहेत.

मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना अंधेरीत घडली होती. या प्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे.सीमा (नावात बदल) ही १५ वर्षीय मुलगी अंधेरीच्या जे.बी. नगर परिसरात राहते. तिच्या आईचे आणि अटक केलेल्या राधेश्याम नायर यांचे राहत्या घरावरून गेली काही वर्षे वाद सुरू आहेत. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एकाच घरात पीडित ही तिच्या आईसोबत तर नायर हे त्यांच्या पत्नीसोबत याच घरात राहतात. सप्टेंबर महिन्यात सीमाची आई काही कामानिमित्त मुंबईबाहेर गेली होती. मात्र सीमाची परीक्षा असल्याने ती अंधेरीतच होती. ३ आॅक्टोबरच्या रात्री अभ्यास करता करता सीमा हॉलमध्येच झोपी गेली. तेव्हा रात्री २च्या सुमारास तिला कोणीतरी अश्लील स्पर्श करत असल्याचे जाणवले. तिला जाग आली तेव्हा नायर हे त्या ठिकाणी तिला दिसले. याबाबत आईला सांगू नकोस; अन्यथा तू मुलांना घरात बोलावतेस, असे सांगून बदनामी करेन, असे त्याने धमकावल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार विनयभंग आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नायर हे बाहेरगावी असल्याने त्यांना अटक करण्यात आली नव्हती. अखेर गुरुवारी त्यांना अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी सांगितले. नायर हे रेल्वेचे माजी अधिकारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :गुन्हापोलिसअटक