राज्यात कोरोनाचे ६४, मुंबईत १२ नवे रुग्ण
By संतोष आंधळे | Updated: January 14, 2024 20:23 IST2024-01-14T20:23:15+5:302024-01-14T20:23:46+5:30
Corona Virous: राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये रविवारी राज्यात एकूण ६४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील १२ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत.

राज्यात कोरोनाचे ६४, मुंबईत १२ नवे रुग्ण
- संतोष आंधळे
मुंबई- राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये रविवारी राज्यात एकूण ६४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील १२ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ६२४ आणि मुंबईत १५४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आज १११ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे १२ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकीकोणत्याही रुग्णाला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १८ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात २४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - १२
ठाणे -१
ठाणे मनपा - ८
नवी मुंबई मनपा -८
कल्याण डोंबिवली - १
उल्हासनगर मनपा - १
रायगड -१