Join us  

कोकण रेल्वेवर ६३० कर्मचाऱ्यांची गस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 6:22 AM

पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने, या काळात दरड कोसळणे वा अन्य कुठलीही अनुचित दुर्घटना घडू नये, यासाठी कोकण रेल्वेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

मुंबई : पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने, या काळात दरड कोसळणे वा अन्य कुठलीही अनुचित दुर्घटना घडू नये, यासाठी कोकण रेल्वेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मान्सून काळात या मार्गवर दररोज ६३० कर्मचारी गस्त घालणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.कोलाड ते ठोकूर या मार्गावर कोकण रेल्वेने विशेष खबरदारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठीची पावसाळापूर्व कामे पूर्ण केली आहेत. रेल्वे मार्गालगतच्या दरडी, माती आणि दगड दूर करण्यात आले असून, अनावश्यक खड्डे बुजवले आहेत. यामुळे या मार्गावर सुधारणा झाली असून, माती सरकण्याच्या घटना घडण्याची शक्यता कमी झाली आहे, तसेच यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी वाहतूक सुरक्षित होणार असून दुर्घटनाही टळेल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात वाहतूक सुरळीत व्हावी, म्हणून या मार्गावर ६३० कर्मचारी दररोज गस्त घालणार आहेत. सोबतच जास्त पाऊस पडल्यास खबरदारी घेत, रेल्वेचा वेग कमी ठेवण्याचे निर्देश चालकांना देण्यात आले आहेत.>वेग मंदावणारकोकण रेल्वेच्या विविध भागांत जाणाºया गाड्यांचा सामान्य वेग ताशी ११० किमी इतका असतो. मात्र, रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दृश्यमानता कमी असेल, तेव्हा हाच वेग ताशी ४० किमी प्रति तास कमी करून, गाड्या चालवण्याचे निर्देश चालकांना देण्यात आले आहेत. एखादी अनुचित घटना घडल्यास रेल्वेच्या साहाय्याने वैद्यकीय मदत पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :कोकणकोकण रेल्वे