महाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ६३ अर्ज
By Admin | Updated: July 25, 2015 22:41 IST2015-07-25T22:41:30+5:302015-07-25T22:41:30+5:30
महाडमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ६३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती महाड तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

महाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ६३ अर्ज
बिरवाडी : महाडमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ६३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती महाड तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
महाड तालुक्यातील बिरवाडी आसनपोई, मांडले, भेलोशी, नरवण या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तर महाड तालुक्यातील ४३ ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये मुमुर्शी ग्रामपंचायतीचा एक अर्ज, तेलंगे मोहल्ला एक, अप्पर तुडील एक जागेकरिता दोन अर्ज, आसनपोई सात, पिंपळकोंड दोन, घावरेकोंड एक, शेल एक, मांडले सात, पंदेरी एक, निगडे एक, राजेवाडी एक जागेकरिता दोन अर्ज, भेलोशी सहा जागांकरिता १२ अर्ज, नरवण पाच जागांकरिता ११ अर्ज, बिरवाडी १७ जागांकरिता ३६ अर्ज, पडवी २ असे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये आसनपोई ग्रामपंचायत व मांडले ग्रामपंचायत याठिकाणी सात जागांकरिता प्रत्येकी सात उमेदवारी अर्ज आल्याने या ठिकाणची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे. बिरवाडी ग्रामपंचायतमध्ये १७ जागांकरिता एकूण ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याने तिरंगी लढत होणार आहे. (वार्ताहर)
निवडणूक चिन्हांचे केले वाटप
उमेदवारी अर्ज निश्चित झाल्याने उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप निवडणूक निर्णय अधिकारी महाडचे तहसीलदार संदीप कदम यांनी केले आहे. या निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच भारतीय जनता पक्षाने देखील आपले उमेदवार उभे केले आहेत. निवडणूक रंगतदार होणार आहे.