शहरात 62 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित
By Admin | Updated: October 4, 2014 01:17 IST2014-10-04T01:17:58+5:302014-10-04T01:17:58+5:30
शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघांतील 2 हजार 545 मतदान केंद्रांतील एकूण 62 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

शहरात 62 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित
>मुंबई : शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघांतील 2 हजार 545 मतदान केंद्रांतील एकूण 62 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मतदान ओळखपत्रे नसलेल्या आणि स्थलांतरित मतदारांची संख्या जास्त असलेल्या मतदान केंद्रांचा समावेश संवेदनशील मतदान केंद्रात करण्यात येतो.
एका मतदान केंद्रातील यादीत सरासरी 1 हजार मतदारांचा समावेश असतो. फोटो ओळखपत्र नसल्यामुळे मतदारांची ओळख पटणो कठीण होते. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता असते. निवडणूक आयोगाच्या कर्मचा:यांनी घरोघरी जाऊन सव्रे केला. त्यामुळे सुमारे 9क् टक्के मतदारांना फोटो ओळखपत्रे
देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले. शहरात सर्वाधिक म्हणजेच 14 संवेदनशील मतदान केंद्रे मुंबादेवी मतदारसंघात असून, त्याखालोखाल शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात 13 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. तर मलबार हिल आणि वडाळा या ठिकाणी प्रत्येकी एक म्हणजेच सर्वात कमी संख्येने संवदेनशील केंद्रे आहेत. (प्रतिनिधी)
मतदान ओळखपत्रे नसलेल्या आणि स्थलांतरित मतदारांची संख्या जास्त असलेल्या मतदान केंद्रांचा समावेश संवेदनशील मतदान केंद्रात होतो. यानुसार सर्वाधिक संवेदनशिल मतदान केंद्रे मुंबादेवीत, तर सर्वात कमी मतदार केंद्रे वडाळा आणि मलबार हिल येथे आहे.
मतदारसंघकेंद्रेसंवेदनशील
धारावी269क्5
शीव-कोळीवाडा26413
वडाळा222क्1
माहीम244क्4
वरळी242क्3
शिवडी249क्5
भायखळा247क्9
मलबार हिल275क्1
मुंबादेवी24214
कुलाबा291क्7
एकूण2,54562