काश्मीरमधून परतले 61 ठाणोकर

By Admin | Updated: September 18, 2014 02:18 IST2014-09-18T02:18:36+5:302014-09-18T02:18:36+5:30

जम्मू-काश्मीरमधील जनजीवन आता पूर्वपदावर येत असले तरी निसर्गाचे रौद्ररूप पाहून घरी परतलेल्या ठाणोकरांच्या अंगावर आजही ते क्षण आठवून शहारे उभे राहत आहेत.

61 Thanokar returned from Kashmir | काश्मीरमधून परतले 61 ठाणोकर

काश्मीरमधून परतले 61 ठाणोकर

ठाणो : जम्मू-काश्मीरमधील जनजीवन आता पूर्वपदावर येत असले तरी निसर्गाचे रौद्ररूप पाहून घरी परतलेल्या ठाणोकरांच्या अंगावर आजही ते क्षण आठवून शहारे उभे राहत आहेत. कापूरबावडी येथाल ‘जय माता दी ट्रस्ट’च्या माध्यमातून वैष्णोदेवी व जम्मू-काश्मीर सहलीसाठी गेलेले 61 पर्यटक नुकतेच घरी परतले. त्यांच्याशी लोकमतने संवाद साधला असता, त्यांनी या भावना व्यक्त केल्या. 
‘जय माता दी ट्रस्ट’च्या माध्यमातून 2क् महिला, 1क् मुले आणि 31 पुरुष असे 61 जण काश्मीरमध्ये गेले होते. ते 3 सप्टेंबरला बोरिवलीहून ‘गोल्डन टेम्पल ट्रेन’ने अमृतसरकडे रवाना झाले होते. अमृतसरला खूप पाऊस पडत होता. या पावसातच सुवर्ण मंदिरात दर्शन घेऊन यात्रेकरू बसने वाघा बॉर्डरकडे निघाले. भारतीय जवानांची भेट घेऊन 6 सप्टेंबरला जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले. तेथून ख:या अर्थाने धकाधकीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचे ठाणोकर जे. आर. पांडे यांनी सांगितल़े ‘आम्ही पठाणकोटच्या आसपास पोहोचताच वादळी वारा आणि पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर झाड पडले. 
सुमारे तीन तास गाडी खोळंबली होती. जम्मूला पोहोचलो तेव्हा धो-धो पाऊस पडत होता. त्यामुळे नाले भरून वाहत असल्याचे चित्र होते. जे हॉटेल बुक केले होते, तेथे जाण्याचे सर्वच रस्ते बंद झाले होते. त्यामुळे आम्ही कटराला जाण्याचा निर्णय घेतला. जम्मूवरून कटरासाठी निघाल्यानंतर अर्धा रस्ता बंद असल्याचे 
समजले. मात्र, दोन तास थांबल्यानंतर तो सुरू झाल्याने कसेबसे कटराला पोहोचलो. मात्र, वैष्णोदेवीचे दर्शन बंद असल्याचे समजले. तसेच दर्शनासाठी प्रवेश घेण्यासाठी ज्या पावत्या देण्यात येत होत्या, त्यासाठी तीन किलोमीटर्पयत लांबचलांब 
रांग दिसून आली. तेथील प्रवेश पावत्या मिळवल्या आणि दर्शन घेऊन पुढील नियोजित कार्यक्रम रद्द 
केला, अन् ठाण्यासाठी प्रयाण 
केले,’ असे पांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्ट्रस्ट पाच वर्षापासून काश्मीरमध्ये सहली आयोजित करत आहे. ‘नैसर्गिक आपत्ती डोळ्यांनी पाहिल्याने ती किती भयावह असते, ते आम्ही सर्वानी अनुभवले आणि वेळीच सर्वानी कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेच आम्ही सर्वजण सुखरूप घरी परतलो,’ अशा शब्दांत पांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

Web Title: 61 Thanokar returned from Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.