मुंबईत दिवसभरात ६०० कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:06 IST2021-07-10T04:06:17+5:302021-07-10T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. शुक्रवारी दिवसभरात सहाशे कोरोनाबाधित आढळले ...

मुंबईत दिवसभरात ६०० कोरोनाबाधित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. शुक्रवारी दिवसभरात सहाशे कोरोनाबाधित आढळले आहेत तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत घट होत असल्याने रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०७ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ८९२ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख २६ हजार ६३७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख ९७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ५९९ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ७३१ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्यूमुखी पडलेल्या १३ रुग्णांपैकी १० रुग्णांना सहव्याधी होत्या.
मृतांमध्ये नऊ पुरुष तर चार महिला रुग्णांचा समावेश होता. मृत झालेले १० रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर तीन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३९ हजार ७५ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ७४ लाख ६२ हजार ५५८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.