दिवसभरात राज्यात ६ हजार ७५३ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST2021-07-24T04:06:15+5:302021-07-24T04:06:15+5:30

मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ हजार ७५३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२ ...

6 thousand 753 patients were registered in the state during the day | दिवसभरात राज्यात ६ हजार ७५३ रुग्णांची नोंद

दिवसभरात राज्यात ६ हजार ७५३ रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ हजार ७५३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२ लाख ५१ हजार ८१० झाली आहे. तर, दिवसभरातील ५ हजार ९७९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६० लाख २२ हजार ४८५ इतकी झाली आहे. सध्या राज्यात ९४ हजात ७६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्क्यांवर पोहचले आहे. तर, मृत्यूदर २.०९ टक्के एवढे झाला आहे. शुक्रवारी १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत १ लाख ३१ हजार २०५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासलेल्या ४ कोटी ६४ लाख ४६ हजार ३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ५१ हजार ८१० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५२ हजार ७०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर, ३ हजार ६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title: 6 thousand 753 patients were registered in the state during the day