भार्इंदरमध्ये ६ वारागंनांना अटक
By Admin | Updated: January 12, 2015 22:28 IST2015-01-12T22:28:45+5:302015-01-12T22:28:45+5:30
तरुणींना वाममार्गाला लावणाऱ्या महिलेसह सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणाऱ्या पाच महिलांना ठाणे ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नुकतीच अटक केली आहे.

भार्इंदरमध्ये ६ वारागंनांना अटक
भाईंदर : तरुणींना वाममार्गाला लावणाऱ्या महिलेसह सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणाऱ्या पाच महिलांना ठाणे ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नुकतीच अटक केली आहे.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कक्षाचे प्रभारी सचिन गवस यांच्या पथकाने मीरारोड येथील एका वाईन शॉप जवळ सापळा लावुन तेथे देहविक्रीचा व्यवसाय करणाय््राा रेश्मा चांदिवडे या महिलेसह दोन तरुणींना ताब्यात घेतले. चांदिवडे ही गरजु तरुणींना हेरुन त्यांना वाममार्गाला लावत असल्याचे चौकशीतून समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला गजाआड करुन पिडीत दोन तरुणींची सुटका केली आहे. तसेच भार्इंदर पूर्वेच्या खारीगाव नाका परिसरात अश्लिल चाळे करणाऱ्या पाच महिलांना अटक करुन त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली असल्याचे गवस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)