१० पैकी ६ व्यक्तींना मधुमेहाचा धोका!

By Admin | Updated: April 27, 2015 04:41 IST2015-04-27T04:41:32+5:302015-04-27T04:41:32+5:30

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भविष्यात १०पैकी ६ जणांना मधुमेह होण्याचा धोका असल्याची चिंता विक्रोळी मेडिकोस

6 out of 10 people have diabetes risk! | १० पैकी ६ व्यक्तींना मधुमेहाचा धोका!

१० पैकी ६ व्यक्तींना मधुमेहाचा धोका!

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भविष्यात १०पैकी ६ जणांना मधुमेह होण्याचा धोका असल्याची चिंता विक्रोळी मेडिकोस असोसिएशनने रविवारी आयोजित केलेल्या व्हिमकॉम २०१५ या परिषदेत व्यक्त करण्यात आली. परिषदेत फुप्फुसाचा कर्करोग, यकृत प्रत्यारोपण अशा विविध विषयांवर डॉक्टरांनी चर्चा केली.
सध्या फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. सतत १० वर्षे धूम्रपान करण्याऱ्या व्यक्तीस फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका ९० टक्क्यांनी वाढतो. त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान होत नाही. तिसऱ्या टप्प्यातच आजाराचे निदान होते. यासाठी डॉक्टरांनी फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान लवकर व्हावे, यासाठी काय करावे, याविषयी डॉक्टरांना माहिती देण्यात आली. असोसिएशनचे सदस्य डॉ. हिरामन महांगडे यांनी सांगितले, अमेरिकेत धूम्रपानाची टक्केवारी घटत आहे.
तर उलटपक्षी भारतात ही टक्केवारी वाढत आहे. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. (प्रतिनिधी)

Web Title: 6 out of 10 people have diabetes risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.