राज्यात काेराेनाचे ५९ हजार ५६९ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:07 IST2020-12-22T04:07:38+5:302020-12-22T04:07:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६ हजार ५३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण १७ लाख ...

59 thousand 569 active patients of Kareena in the state | राज्यात काेराेनाचे ५९ हजार ५६९ सक्रिय रुग्ण

राज्यात काेराेनाचे ५९ हजार ५६९ सक्रिय रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६ हजार ५३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण १७ लाख ८९ हजार ९५८ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२४ टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या केवळ ५९ हजार ५६९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात सोमवारी काेराेनाच्या २ हजार ८३४ रुग्णांचे निदान झाले असून, ५५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १८ लाख ९९ हजार ३५२ झाला असून, मृतांची संख्या ४८ हजार ८०१ झाली. सध्या राज्याचा मृत्युदर २.५७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २१ लाख ५७ हजार ९५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.६२ टक्के नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ९३८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३ हजार ५७९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

................................

Web Title: 59 thousand 569 active patients of Kareena in the state