मुंबई - कामगार कल्याण योजनेचा भाग म्हणून आश्रय योजनेंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून चेंबूर येथे पुनर्विकासांतर्गत आधुनिक प्री फॅब्रिकेशन (पूर्वनिर्मित) तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी ५८० सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आधीच्या टप्प्यात चेंबूर येथेच एक हजार १९४ सदनिका बांधण्यात येत असून, त्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
अत्यंत दयनीय, अस्वच्छ वातावरणात सफाई कामगार कार्यरत असतात. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. या कामगारांचा मृत्यूदरही अधिक आहे. सफाई कामगारांच्या या समस्या सोडवितानाच त्यांना कार्यक्षेत्राजवळच निवास व्यवस्था पुरवण्यासाठी पालिकेने आश्रय योजनेंतर्गत घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.
आठ इमारतींवर हातोडा; चार 'एफएसआय'चा लाभ- महापालिकेत २७ हजार ९१२ सफाई कामगार आहेत. 'आश्रय'अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांच्या ४६ पैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास केला जात आहे. चेंबूरच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पासाठी सात हजार १०८.२७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. ८ ते १५ क्रमांकाच्या एकूण आठ इमारती पाडण्यात येणार आहेत.- आधुनिक, टिकाऊ आणि प्री फॅब्रिकेशन तंत्रज्ञानावर आधारित इमारती तेथे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक सदनिका ३०० चौरस फुटांची असून, इमारतींना चार एफएसआय वापरण्यात येणार आहे. आरसीसीसाठी एम-४० दर्जाचे काँक्रीट वापरणे बंधनकारक आहे. ५८० सदनिकांसाठी पालिकेने डिझाइन अँड बिल्ट टर्नकी पद्धतीने कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
सीसीटीव्ही, लिफ्ट, पार्किंग, रस्ते, ड्रेनेजची सुविधाचेंबूरच्या प्रकल्पात आग प्रतिबंध व नियंत्रण प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, सौर ऊर्जाप्रणाली, पाणी साठवण टाक्या, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (गरज भासल्यास), लिफ्ट, पार्किंग, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, वीज व पाणीपुरवठा आदी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. बांधकाम काळात सुरक्षिततेसाठी आवश्यक बॅरिकेड्स, धूळ तसेच हवेच्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी हवा गुणवत्ता तपासणी प्रणाली बंधनकारक आहे, असे प्रशासनाने सांगितले.
२०२८ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट३० वसाहतींच्या पुनर्विकासासाठी कार्यादेश दिले असून, सफाई कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची (३०० चौ. फूट) १२ हजार घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून २०२८ पर्यंत सर्व घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : Chembur redevelopment project provides 580 more homes for sanitation workers under the Ashray Yojana. Using pre-fabricated technology, it follows an earlier phase of 1,194 homes by 2026. The project aims to improve living conditions with modern amenities, targeting completion by 2028.
Web Summary : आश्रय योजना के तहत चेम्बूर पुनर्विकास परियोजना में सफाई कर्मचारियों के लिए 580 और घर। प्री-फैब्रिकेटेड तकनीक का उपयोग करते हुए, यह 2026 तक 1,194 घरों के पहले चरण का अनुसरण करता है। परियोजना का लक्ष्य 2028 तक आधुनिक सुविधाओं के साथ रहने की स्थिति में सुधार करना है।