मुंबईत काेराेनाचे ५७४ रुग्ण, आठ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:09 IST2021-01-16T04:09:03+5:302021-01-16T04:09:03+5:30

मुंबई : मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५७४ कोरोनबाधित रुग्ण सापडले असून, ८ मृत्यूंची नाेंद झाली. दिवसभरात ७९३ रुग्ण बरे ...

574 patients of Kareena in Mumbai, eight deaths | मुंबईत काेराेनाचे ५७४ रुग्ण, आठ मृत्यू

मुंबईत काेराेनाचे ५७४ रुग्ण, आठ मृत्यू

मुंबई : मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५७४ कोरोनबाधित रुग्ण सापडले असून, ८ मृत्यूंची नाेंद झाली. दिवसभरात ७९३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११२२७ एवढा आहे. रग्णदुपटीचा कालावधी ३८२ दिवसानंतर पाेहाेचला आहे.

सध्या सात हजार १०४ सक्रिय रुग्ण आहेत. तर बाधितांचा आकडा तीन लाख एक हजार ६५२ एवढा आहे. आतापर्यंत दोन ८२ हजार ४३५ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या आठ कोरोना रुग्णांपैकी सहा रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यूंपैकी तीन रुग्ण पुरुष आणि पाच रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी सहाजणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित दोन रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते.

..................

Web Title: 574 patients of Kareena in Mumbai, eight deaths