५७ स्वस्त धान्य दुकानांना टाळे
By Admin | Updated: February 23, 2015 00:57 IST2015-02-23T00:57:31+5:302015-02-23T00:57:31+5:30
तालुक्यातील जवळपास ६0 स्वस्त धान्य दुकानांना टाळे लागले आहे. त्यामुळे इतर दुकानांवर त्याचा भार वाढला आहे, शिवाय दुकान बंद झालेल्या गावातील लाभार्थींना मोठ्या

५७ स्वस्त धान्य दुकानांना टाळे
प्रशांत शेडगे, पनवेल
तालुक्यातील जवळपास ६0 स्वस्त धान्य दुकानांना टाळे लागले आहे. त्यामुळे इतर दुकानांवर त्याचा भार वाढला आहे, शिवाय दुकान बंद झालेल्या गावातील लाभार्थींना मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागत आहे. काही दुकानदारांचे परवाने रद्द झाले आहेत, तर काहींनी राजीनामे दिले आहेत. इतर कारणांमुळे दुकानदार दुकान बंद करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य घेणेही महाग होत चालले आहे.
पनवेल तालुका हा विस्ताराने मोठा असून या ठिकाणी १८८ महसुली गावे आहेत. हा तालुका शहरीबहुल असला तरी ग्रामीण लोकसंख्या कमी नाही. दुर्गम भागात वाड्या आणि पाडे असून त्या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज यासारख्या पायाभूत सुविधा पोहचल्या नाहीत. मात्र तेथे रास्त भाव धान्य दुकाने पोहचिवण्यास तालुका प्रशासनाला यश मिळाले होते. एकूण १८८ पैकी १८२ ठिकाणी प्रशासनाने दुकाने सुरू केली होती. तेथून धान्य वितरण केले जात असे. आज शहरी भागात स्वस्त धान्याच्या दुकानात लोक फिरकत नसले तरी ग्रामीण भागात मात्र गहू, तांदूळ आणि साखरेची वाट पाहिली जाते. अन्न सुरक्षा योजनेत बसणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या पनवेलात ६0 हजारांपेक्षा जास्त आहे. या योजनेत अंत्योदय लाभार्थ्याला तीन रूपये किलोने प्रति शिधापत्रिका २५ किलो तांदूळ आणि २ रूपये दराने प्रत्येक लाभार्थ्याला १0 किलो धान्याचे वाटप केले जाते. एपीएल आणि बीपीएल लाभार्थ्याला प्रति व्यक्ती तीन किलो तांदूळ आणि २ किलो गहू मिळतो. एपीएल कार्डधारकांना प्रति कार्ड १0 किलो तांदूळ आणि ५ किलो गहू अनुक्र मे ९.६0 आणि ७.२0 रूपये दराने दिले जाते.
तालुक्यात ११२८६८ इतके शिधापत्रिकाधारक आहेत. त्यानुसार दरमहा हजारो टन धान्याचे वितरण करावे लागते.