मुंबई टॉपवर तीन विमानतळांवर पकडले ५६ टक्के सोने
By Admin | Updated: February 10, 2017 00:41 IST2017-02-10T00:41:13+5:302017-02-10T00:41:13+5:30
दिल्ली, मुंबई आणि चेन्नई विमानतळांवरुन सोन्याची सर्वाधिक तस्करी होत आहे. तस्करीचे सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत.

मुंबई टॉपवर तीन विमानतळांवर पकडले ५६ टक्के सोने
नितीन अग्रवाल , नवी दिल्ली
दिल्ली, मुंबई आणि चेन्नई विमानतळांवरुन सोन्याची सर्वाधिक तस्करी होत आहे. तस्करीचे सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. तर, दिल्लीत इंदिरा गांधी विमानतळावर सर्वाधिक सोने जप्त करण्यात आल्याची माहिती अर्थ राज्य मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी दिली.
संतोषकुमार गंगवार यांनी सांगितले की, २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रातून विमानतळांवरुन सोन्याच्या तस्करीचे ६५४ प्रकरणे दाखल झाले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ५८६, पुणे विमानतळावरील
६३ आणि नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर तस्करीचे ५ प्रकरणे पकडण्यात आली.
या सर्व प्रकरणात ४७० किलो सोने जप्त करण्यात आले. यापूर्वी २०१४-१५ मध्ये तीन विमानतळांवरुन पकडण्यात आलेल्या ८१५ प्रकरणात १०१३ किलो आणि २०१३-१४ मध्ये २८४ प्रकरणात २८३ कि लो सोने जप्त करण्यात आले.