अपना बँकेची ५५ वी शाखा कार्यान्वित

By Admin | Updated: February 22, 2015 01:17 IST2015-02-22T01:17:27+5:302015-02-22T01:17:27+5:30

नवी मुंबई येथील शाखेचे नुकतेच श्री लेवा पटिघर कन्या केलवान्नी मंडळ, कच्छ या संस्थेचे ट्रस्टी आणि बांधकाम व्यावसायिक भानजीभाई रावरिया यांच्या हस्ते झाले.

55th branch of your bank implemented | अपना बँकेची ५५ वी शाखा कार्यान्वित

अपना बँकेची ५५ वी शाखा कार्यान्वित

मुंबई : अपना सहकारी बँकेच्या खारघर, नवी मुंबई येथील शाखेचे नुकतेच श्री लेवा पटिघर कन्या केलवान्नी मंडळ, कच्छ या संस्थेचे ट्रस्टी आणि बांधकाम व्यावसायिक भानजीभाई रावरिया यांच्या हस्ते झाले. बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या वेळी बोलताना चाळके म्हणाले की, सक्षम व उत्तम आर्थिक व्यवस्थापनाचे रिझर्व्ह बँकेचे सर्व मापदंड बँक पूर्ण करीत असून बँकेस आता मोबाइल बँकिग सेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे. लवकरच या सेवा ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू होतील.
तसेच सन २००८ पासून संचालक मंडळाने बँकेच्या शाखांचे महाराष्ट्रभर विस्तार करण्याचे धोरण ठरविले. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या शाखा विस्ताराच्या धोरणास अनुसरून ठरविण्यात आलेले सर्व मापदंड पूर्ण करून शाखा विस्ताराची जेवढी मागणी केली तेवढ्या शाखा रिझर्व्ह बँकेने मंजूर केल्या. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत बँकेने १३ वरून ५५ शाखांचा विस्तार केला आणि बँकेने मल्टीटेस्ट दर्जाही प्राप्त केला. (वा.प्र)

Web Title: 55th branch of your bank implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.