मुंबईतील ५५७ इमारती धोकादायक

By admin | Published: April 30, 2015 02:09 AM2015-04-30T02:09:40+5:302015-04-30T02:09:40+5:30

मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यात मुंबईतील तब्बल ५५७ इमारती अतिधोकादायक असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ यामध्ये म्हाडाच्या उपकरप्राप्त, खाजगी व पालिका इमारतींचाही समावेश आहे़

557 buildings in Mumbai are dangerous | मुंबईतील ५५७ इमारती धोकादायक

मुंबईतील ५५७ इमारती धोकादायक

Next

मुंबई : मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यात मुंबईतील तब्बल ५५७ इमारती अतिधोकादायक असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ यामध्ये म्हाडाच्या उपकरप्राप्त, खाजगी व पालिका इमारतींचाही समावेश आहे़
यंदाच्या धोकादायक इमारतींच्या यादीनुसार पूर्व उपनगरांत सर्वाधिक २२९ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे़ यापैकी कुर्ला
आणि घाटकोपरसाठी धोक्याची घंटा वाजविण्यात आली आहे़ यामध्ये अनुक्रमे १०० व ५६ इमारती अतिधोकादायक असल्याचे दिसून आले़ त्याखालोखाल पश्चिम उपनगरांत २२१, तर शहर भागात १०७ इमारती धोकादायक आहेत़ या इमारतींना पालिकेने नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे़ तसेच काही ठिकाणी कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे़ नुकतेच माझगाव ताडवाडी येथे पालिकेचे पथक कारवाईसाठी गेले होते़ परंतु स्थलांतरित न होणाऱ्या रहिवाशांना त्यांच्याच जबाबदारीवर सोडून देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 557 buildings in Mumbai are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.